महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत चर्होली येथील वाघेश्वर विद्यालय संघाने निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय संघाचा 25-21, 25-15, 15-13 असा पराभव करीत 17 वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा निगडीतील सिटी प्राईड स्कूल येथे सुरू आहेत. अंतिम सामन्यात वाघेश्वर विद्यालयाच्या अथर्व कुलकर्णी व बालाजी मोरे यांनी उत्कृष्ट खेळ करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. पराभूत ज्ञान प्रबोधिनीच्या श्रीधर लिंगाडे याने चांगला प्रतिकार केला. मात्र, तो पराभव टाळू शकला नाही.
उपांत्य फेरीत वाघेश्वर विद्यालयाने प्रियदर्शनी स्कूलचा 25-14, 25-10 असा पराभव केला. तर, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने ज्ञानदिप विद्यालयाचा 25-6, 25-10 असा पराभव केला.
स्पर्धेचे उद्घाटन माजी महापौर अनिता फरांदे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमहापौर तथा क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे, ‘अ’ प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, व्हॉलीबॉल संघाचे मार्गदर्शक देवीदास जाधव, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, मुख्याध्यापिका माया सावंत आदी उपस्थित होते. क्रीडा पर्यवेक्षक सुभाष पवार यांनी प्रास्ताविक केले.
उपउपांत्यफेरीचे सामना पुढीलप्रमाणे आहेत
वाघेश्वर विद्यालय वि. वि. ज्ञानदिप विद्यालय (25-5, 25-11). ज्ञान प्रबोधिनी वि. वि. रामचंद्र गायकवाड विद्यालय (25-12, 25-21, 15-3). प्रियदर्शनी स्कूल वि. वि. एच. ए. स्कूल (25-12, 25-11). ज्ञानदिप विद्यालय वि. वि. एसएनबीपी स्कूल (25-6, 25-16)