निर्भीड न्यूज –
चिखलीतील जाधववाडी येथील पंकज चंद्रकांत अहिनावे वय 25 या तरुणाने एमआयडीसी येथील एका खासगी कंपनीत कंपनीच्या गच्चीवर केबल वायरच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास एका खासगी कंपनीत घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज एमआयडीसी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. बुधवारी त्याची रात्रपाळी होती. दुपारी दोनच्या सुमारास कंपनीतील एक कामगार गच्चीवर गेला असता पंकज केबलच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.