आ. शेळकेंच्या हस्ते जल शुद्धीकरण प्रकल्पाचे उदघाटन
निर्भीडसत्ता न्यूज । मावळ
वराळे गावात कचरा प्रकल्प व सांडपाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असून विविध विकासकामांसाठी येत्या काळात 1 कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेणार असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले. वराळे गावातील
नुतन जल शुद्धिकरण प्रकल्पाचे उदघाटन आमदार शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते आ. शेळके यांचा भव्य नागरी सत्कारही करण्यात आला.
भीमाशंकर कॉलोनी, वराळे मावळ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास तळेगाव नगर परिषदेचे नगरसेवक गणेश काकडे, सभापती विठ्ठलराव शिंदे, सरपंच मनोहर मराठे, उपसरपंच रामचंद्र मराठे, निलेश मराठे, संतोष मराठे, कल्पेश मराठे, राम मराठे पाटील, आशाताई भवार
नवनिर्वाचित उपसरपंच प्रियंका रामदास भेगडे, सदस्य सारिका रामदास मांडेकर, मनिषा राम मराठे, अस्मिता निलेश मराठे, रुपाली राजाभाऊ आढळे, सिमा विकास मराठे, लिलाबाई वाजे विकास भाऊ पवार, निलेश दत्तू मराठे, गणेश मच्छींद्र मराठे तसेच आजी-माजी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामभाऊ मराठे पाटील यांनी केले व आभार रामदास मांडेकर यांनी मानले.