पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरवासीयांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा. त्यांचा भव्य पुतळा पुतळा निगडी येथील टिळक चौक उभारला जावा, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.
या संदर्भात तुषार हिंगे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. हिंगे म्हणाले की, संताजी जगनाडे महराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 ला चाकण येथे झाला. ते संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या टाळकर्यांतील प्रमुख टाळकरी होते. त्यांना ‘संतु तेली’ नावानेही ओळखत होते. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे संताजी जगनाडे महाराज यांनी लिहिले होते.
जगनाडे महाराज यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून राज्य शासनाने 8 डिसेंबरला त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे आदेश दिले आहेत.संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा निगडीच्या टिळक चौकात उभारण्यात यावा. त्या भोवती सुशोभिकरण करण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर हिंगे यांनी केली आहे.