पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
सांगवी, आकुर्डी चर्होली, चिंचवड स्टेशन, आकुर्डी येथील प्रत्येकी एक असे एकूण 4 जणांना कोरोनाची गुरूवारी (दि.14) लागण झाली. तर, पुण्यातील गाडीतळ येथील एका महिलेस कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 193 झाली आहे.
त्यात 28 वर्षीय तरूण, 23 वर्षीय तरूणी, 40, 50 व 58 वर्षांची महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर वायसीएम, भोसरी व पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुण्यातील ताडीवाला रस्ता येथील एक कारोनाबाधित बरा झाल्याने त्याला वायसीएम रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आले. कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या 124 झाली आहे. आज 323 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची एकूण संख्या 6 हजार 417 झाली आहे.आज एकूण 33 संशयित रूग्णांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण 4 हजार 260 पैकी 4 हजार 23 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सांगवी, आकुर्डीतील परिसर सील
कोरोनाचे रूग्ण आढळल्याने सांगवीतील बुध्दघोष हाउसिंग सोसााटी व आकुर्डीतील शुभश्री हाउसिंग सोसायटी परिसर गुरूवारी (दि.14) सील करण्यात आला. तेथील रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. जुनी सांगवी येथील एसटी कॉलनीस लागून बुद्धघोष सोसायटी परिसर आहे. तेथील न्यू युनिटी मेडिकेअर, जयराज रेसिडन्सी फेज वन, गणेश बेकरी, वाघमारे रस्ता, हर्षल इलेक्ट्रीक्स, शिवगंगा कॉम्प्लेक्स या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. आकुर्डीतील शुभश्री सोसायटी, जय गणेश हॉटेल, मदिना मशिद, सद्गगुरू अपार्टमेंट, आकुर्डी मुख्य रस्ता, खंडोबा माळ चौक, आयनॉक्स रस्ता, जय गणेश व्हिजन, हॉटेल आंगण या परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यास आली असून, मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.