पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (दि.17) 4 पुरूष व 5 महिला असे एकूण 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व जण पिंपळे गुरव, संभाजीनगर, आनंदनगर, दिघी, विकासनगर, मोरेवस्ती-चिखली येथील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामध्येे 27, 36, 50, 50 वर्षांचे पुरूष आणि 19, 25, 33, 40, 63 वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 214 वर पोहचली आहे.
दरम्यान, मोशी, चर्होली, रूपीनगर व संभाजीनगर येथील कोरोनातून बरे झालेले 6 जणांना आज वायसीएम रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एकूण 375 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. तर, 91 संशयितांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले.