पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शहरात विक्रमी संख्येने सर्वांधिक 24 कोरोना रूग्ण सोमवारी (दि.18) सापडले आहेत. त्यामधील सर्वांत जास्त रूग्ण चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील येथील रहिवाशी आहेत. उर्वरित रूग्ण रहाटणी, भाटनगर, भोसरी, दिघी येथील आहेत.
त्यामुळे कोरोना रूग्णांची एकूण संख्या 238 वर पोहलची आहे. पुण्यातील येरवडा व नवी मुंबईतील प्रत्येकी 1 असे दोन रूग्ण ही आज आढळून आले आहेत. त्यापैकी 2 रूग्णांची स्थिती अस्वस्थ आहे.
दरम्यान, रूपीनगर, चिंचवडमधील इंदिरानगर, मोशी, संभाजीनगर, तळवडे, सांगवी या परिसरातील कोरोनातून बरे झालेल्या 6 रूग्णांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे होणार्या रूग्णांची एकूण संख्या 131 झाली आहे. तर, 403 जणांना होम व इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज एकूण 48 संशयितांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले.