पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनाचे रूग्ण सापडल्याने वाकडमधील डांगे चौक व भोसरी येथील शास्त्री चौक ा परिसर रविवारी (दि.24) कंन्टेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आला. तेथील रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
डांगे चौकातील पंडित शोरूम, ओरिएंटल किचन हॉटेल, डांगे चौक रस्ता, प्रतिभा मोटर्स या भागाचा समावेश आहे. भोसरीतील बंधन बँक, अजय डिस्ट्रिब्युटर्स, हॉटेल शांघाई, एचडीएफसी बँक एटीएम, श्रेयस मेडिकल या परिसराचा समावेश आहे. तेथील सर्व रस्ते बाबू व पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे.