पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी (दि.27) 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर वायसीएम व इतर रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, पिंपरी कॅम्पातील भाटनगर व बौध्दनगर चर्होली, किवळे, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, काळेवाडी फाटा, बोपखेल या भागात 12 पुरूष व 10 महिला कोरोनाबाधित झाले आहेत. तर, खेडमधील आंबेगावातील 4 पुरूष कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 450 झाली आहे. त्यातील 249 जण कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. तर, 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. वायसीएम व इतर रूग्णालयात 220 आणि पुण्यातील रूग्णालयात 28 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनातून बरे झाल्याने 21 जणांना घरी सोडण्यात आले. ते आनंदनगर, किवळे, संभाजीनगर, रूपीनगर, रहाटणी, चिखली आणि पुण्यातील बोपोडी व कसबा पेठ येथील रहिवाशी आहेत. दिवसभरात एकूण 465 जणांना होम व इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले. तर, 83 संशयितांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
आज एकूण 62 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले. 209 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. तर, एकूण 5 हजार 593 पैकी 4 हजार 969 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.