पिंपरी | निर्भीडसत्ता न्यू्ज
कोरोनाचे नव्याने रूग्ण आढल्याने चिंचवडमधील अजंठानगर, नेहरूनगर आणि पिंपरी येथील 3 परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून शुक्रवारी (दि.29) सील करण्यात आले. शहरातील कंटेन्मेंट झोनची एकूण संख्या 78 झाली आहे.
अजंठानगरमधील सिद्धार्थ बिल्डींग, अमृता हाउसिंग सोसायटी, ट्रान्सपोर्ट कॉपरेटिव्ह ऑफ इंडिया, विनोद व्हरायटी हा परिसर सील केला आहेे. नेहरूनगरातील कुलदिप अंगण सोसायटी, तरटे किराणा दुकान, लक्ष्मी टेफ्लॉक्स, अमीर चिकन सेंटर हा भाग सील केला आहे. पिंपरीतील सोनकर चेंबर्स, गरीब नबाब हॉटेल, गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स, नानल रूग्णालय हा परिसर सील केला आहे.
येथील रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास बंदी केली आहे. तसेच, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले आहे. बाहेरील व्यक्ती व वाहनांना प्रवेश बंद केला आहे.