पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड लिगल सेलच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी जाधववाडी, चिखली येथील उद्योजक व ऍडव्होकेट विशाल जाधव यांची आज (सोमवारी) निवड करण्यात आली आहे. त्यांना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, लिगल सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे व पदाधिकारी उपस्थित होते.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी विशाल जाधव यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.