- शहरात कोरोनाचे 98 जण पॉझिटिव्ह
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरीतील संत ज्ञानेश्वर कॉलनी येथील 53 वर्षीय महिलेचा, दापोडीतील 52 वर्षीय महिलेचा आणि बोपोडी येतील 70 वर्षीय महिलेचा आणि मूळानगर, खडकी येथील 79 वर्षीय पुरूषाचा पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, आज दिवसभरात एकूण 98 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या 57 झाली आहे. त्यात सर्वांधिक ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचा समावेश आहे. आज कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये पुरूष 57 व महिला 41 आहेत.
ते सांगवी, कामगार भवन, पिंपरी, शंकरनगर, अजंठानगर, पिंपळे निखल, पिंपरी, दत्तनगर, तापकीरनगर, नढेनगर, मधुबन सोसायटी, सांगवी, संत ज्ञानेश्वर कॉलनी, पिंपरी, सुदर्शननगर, मोरेश्वर कॉलनी, थेरगाव, सृष्टी हॉटेल, पिंपळे गुरव, विशालनगर, पिंपळे निलख, सिद्धार्थनगर, दापोडी, काटेपूरम चौक, पिंपळे गुरव, कोकणेनगर, नाशिक हायवे, मोशी, दिघी रोड, भोसरी, बोपखेल, किनारा हॉटेल, दापोडी, मोरया पार्क, पिंपळे गुरव, नवभारतनगर, दापोडी, संभाजीनगर, जयभीमनगर, दापोडी, मोशी, पंचतारा रस्ता, सिंधुनगर, देहूरोड, नेहरूनगर, विजयनगर, काळेवाडी, महात्मा फुलेनगर, भोसरी, वैशालीनगर, पिंपरी, संत तुकारानमनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, दत्त मंदिर, वाकड, थेरगाव, बोपोडी, देहूगाव, मंगळवार पेठ, पुणे येथील रहिवाशी आहेत.
वायसीएम व भोसरी रूग्णालयात एकूण 763 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, पुण्यातील रूग्णालयात 10 जण उपचार घेत आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 हजार 935 झाली आहे.