सातारा : जिल्ह्यातील २२ जणांचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा दिली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ८८८ झाली आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेज व पुण्याच्या एनसीसीएस यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
या २२ जणांमध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील २६ वर्षीय पुरुष, येळगांव येथील ५३, २८ व ५८ वर्षीय महिला, वडगाव येथील ५५ वर्षीय महिला, चचेगाव येथील ४५ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष.
–
कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील ४० वर्षीय महिला, १५ वर्षाचा मुलगा व १४ वर्षाची मुलगी, करंजखोप येथील ४० व ६२ वर्षीय महिला, २१ वर्षीय तरुण. -फलटण रविवार पेठ येथील ६८, २५, ६२ व ६० वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील ३५ वर्षीय महिला -फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील सुरुर येथील ५० वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील रामवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील चाफळ येथील २७ वर्षीय पुरुष.