पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पालकमंत्री अजित पवार व विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येत्या सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन दिर्घकालीन नसून, अल्प मुदतीचा आहे. त्यामुळे नागरिकांनी धसका घेऊन साहित्य खरेदीसाठी शहरातील दुकाने व बाजारपेठेत झुंबड गर्दी करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.10) केले आहे.
हा लॉकडाऊन केवळ 15 दिवसांचा आहे. त्यातील केवळ 5 दिवसांचा लॉकडाऊन हा अधिक कडक आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ 5 दिवसांसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य घरी घेऊन ठेवावेत. त्यासाठी शनिवार (दि.11) ते सोमवार (दि.13) असा 3 दिवसांचा बराच कालवधी आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील लॉकडाऊनबाबतच्या सविस्तर अटी व नियमावली शनिवारी (दि.14) किंवा रविवारी (दि.15) जाहीर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.