पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडी परिसरातील गावठाण, यमुनानगर, साईनाथनगर, सेक्टर क्रमांक 22 येथे गेल्या महिन्याभरापासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाव, पोटदुखी असे आजार होत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर सोमवारी (दि.13) आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेद्वारे करण्यात येणार्या पाणीपुरठा दूषित व गढूळ आहे. त्या पाण्यामुळे नागरिकांना विविध आजार होत आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून पाणी शुद्धीकरणासाठी जास्त प्रमाणात क्लोरीनचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, अशी सचिन काळभोर यांनी केली आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा सचिन काळभोर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.