पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण गायकवाड (वय ६५) यांचे कोरोनामुळे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. लक्ष्मण गायकवाड हे २००२ मध्ये गांधीनगर वॉर्डातून महापालिकेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी झोपडपट्टी सुधारणा समितीचे सभापतीपद भूषविले होते. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते.