पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी शनिवारी (दि.25) विक्रमी 1 हजार 79 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. ही आजपर्यंतची कोरोनाबधितांची सर्वांत मोठी संख्या आहे. तर, 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 517 कोरोनाबाधित बरे झाले.
कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची शहरात एकूण संख्या 15 हजार 939 झाली आहे. तब्बल 5 हजार 216 कोरोना संशयितांच्या घशातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. एकूण 513 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. आज दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 571 जणांना घरी सोडण्यात आले.
आतापर्यंत एकूण 10 हजार 158 कोरोनाबाधित ठणठणीत बरे झाले आहेत. चिंचवड येथील 38, 74 व 95 वर्षीय 3 पुरुष, पिंपळे गुरव येथील 70 वर्षीय पुरुष, संत तुकारामनगर येथील 56 वर्षीय पुरुष, पिंपरी येथील 64 वर्षीय महिला व 80 वर्षीय पुरुष, दापोडी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरूनगर येथील 75 वर्षीय पुरुष, चऱ्होली येथील 67 वर्षीय पुरूष, मोहननगर येथील 67 वर्षीय पुरुष, म्हाळुंगे येथील 38 वर्षीय पुरुष, विश्रांतवाडी, पुणे येथील 72 वर्षीय महिला, बालेवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, मुळशी येथील 68 वर्षीय पुरुष आणि हिंजवडी येथील 84 वर्षीय महिला असे एकूण 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 350 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत.