पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात तिसर्या दिवशी मंगळवारी (दि.28) एक हजारपेक्षा अधिक म्हणजे 1 हजार 181 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 18 हजार 701 झाली आहे. तर, 13 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. तसेच, 432 कोरोना रूग्ण बरे झाले.
सध्या 3 हजार 550 सक्रिय रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यात 49 रूग्ण उपचार घेत आहेत. आज एकूण 5 हजार 667 संशयितांचे घसा व नाकातील द्रव नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. 3 हजार 986 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आतापर्यंत एकूण 89 हजार 65 पैकी 69 हजार 408 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोबाधित 432 जण बरे झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 11 हजार 962 झाली आहे.
उपचारादरम्यान चिंचवड येथील 73 वर्षीय पुरूष आणि 95 वर्षीय महिला, भोसरी येथील 34 वर्षीय पुरूष आणि 80 वर्षीय महिला, जुनी सांगवी येथील 68 वर्षीय पुरूष, कासारवाडी येथील 58 वर्षीय पुरूष, मोशी येथील 65 वर्षीय महिला, काळेवाडी येथील 72 वर्षीय पुरूष, रूपीनगर येथील 51 वर्षीय पुरूष, ताथवडे येथील 58 वर्षीय महिला, वाकड येथील 73 वर्षीय पुरूष, देहूरोड येथील 75 वर्षीय महिला, फुरसुंगी येथील 71 वर्षीय पुरूष असा एकूण 13 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे 382 जणांचे बळी गेले आहेत.