पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.3) कोरोनाबाधित 748 रूग्णांनी नोंद झाली. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 23 हजार 998 वर पोहचली आहे. कोरोनाबाधित 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, 727 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
शहरातील 3 हजार 895 सक्रिय कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 46 जण उपचार घेत आहेत. 727 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्यांची एकूण संख्या 16 हजार 206 झाली आहे.
भोसरी येथील 3, दापोडी येथील 3 सांगवी येथील 2, पिंपरी येथील 2, पिंपळे गुरव येथील 2, थेरगाव येथील 3 आणि काळेवाडी, फुगेवाडी, निगडी, माण, फुरसुंगी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 20 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एकूण 489 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
आज 770 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 54 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 1 हजार 239 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. एकूण 1 लाख 10 हजार 628 जणांपैकी 85 हजार 707 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.