पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर कायम आहे. गुरूवारी (दि.6) तब्बल 1 हजार 12 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या 26 हजार 460 वर पोहचली आहे. तर, 24 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पालिका व खासगी रूग्णालयात तसेच, कोविड केअर सेंटरमध्ये सक्रिय 4 हजार 175 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 50 जण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित 266 रूग्ण बरे झाल्याने त्यांनी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण 17 हजार 673 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
चिंचवड येथील 4, पिंपरी येथील 3, थेरगाव व मोशी येथील प्रत्येकी 2 तसेच, किवळे, भोसरी, कासारवाडी, काळेवाडी, दापोडी, निगडी, दिघी, नेहरूनगर, रूपीनगर, चर्होली, नारायणगाव, शिरूर, येरवडा येथील प्रत्येकी 1 असे एकूण 24 रूग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. एकूण 541 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1 हजार 801 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 757 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 1 हजार 703 जणांचे अहवाल येणे शिल्लक आहे.