पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा अहवाल गुरूवारी (दि.27) कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी अशक्तपणा आल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला होता. त्याचा अहवाल गुरूवारी दुपारी प्राप्त झाला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच ते स्वत:हून पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. ते सकाळी झालेल्या साई चौक, जगताप डेअरी येथील ग्रेडसेपरेटर मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
दरम्यान,आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 15 पेक्षा अधिक नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे.