पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
संभाजीनगर येथील ज्ञानदेव महादेव शिंदे यांचे मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ज्ञानदेव शिंदे यांनी उस्मानाबाद जिल्हातील परांडा पंचायतसमिती मध्ये उपसभापती पद भूषविले होते. त्यांनी विविध गरजुंना शासकीय लाभ मिळवून दिला होता. संभाजीनगर येथील व्यावसायिक पंचशील शिंदे यांचे ते वडील होत.