पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज राजीनामा दिला. महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. महापौरांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.
एवढ्या तडकाफडकी राजीनामा दिल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र राजीनामा का दिला ? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्राच्या माहितीनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.