पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित 355 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर, आज कोरोना पॉझिटिव्ह 209 नवे रुग्णांची नोंद झाली.
कोरोनातून 355 रूग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या 81 हजार 107 झाली आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 85 हजार 323 झाली आहे. सक्रिय 2 हजार 10 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 2 हजार 708 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले.
उपचारादरम्यान, वाकड, पिंपळे सौदागर, संत तुकाराम नगर, भोसरी, चिंचवड, काळेवाडी, किवळे, निगडी येथील रहिवाशी असलेले 9 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 473 रूग्ण मरण पावले आहेत. तर, शहराबाहेरील 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.