वडगाव | निर्भीड सत्ता न्यूज
मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल शंकरराव शेळके त्यांना मिळलेले आजपर्यंतचे वेतन तालुक्यातील गरजु विद्यार्थ्यांसाठी देणार आहेत. मावळ तालुक्यातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शेळके यांचा वर्षभराचा पगार सुमारे १६ लाख ९८ हजार रु. इतका आहे. गरीब व होतकरु मुलांना या शैक्षणिक मदतीचा नक्कीच फायदा होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करा व गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा असे आवाहन त्यांनी या आधीच केले होते. ‘शिक्षण हे देशाचे भवितव्य घडवणारी अतिशय जमेची बाजू आहे. पण आजही सर्वसामान्य कुटुंबातील गरजू, आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक अडचणी उभ्या राहत आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी, असे आवाहन मी माझ्या वाढदिवसाच्या आधी केले होते. त्यास प्रतिसाद देत अनेक ठिकाणी शैक्षणिक मदत केली आहे. पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणास बळ देण्याचा माझा मानस आहे. त्या अनुषंगाने मी आमदार झाल्यापासूनचे सर्व वेतन स्वेच्छेने शैक्षणिक मदत म्हणून देत आहे, असे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले.