मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. रेणू शर्माने तक्रार मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. धनंजय मुंडे यांनी तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्यानेच त्यांनी तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला, असा गौप्यस्फोट भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गायक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारिरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात हादरा बसला होता. मात्र आज सकाळी (शुक्रवार) रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याचं सांगितलं.
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गायक रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरोधात शारिरिक छळाचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. खुद्द सामाजिक न्यायमंत्र्यांवरच बलात्काराचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात हादरा बसला होता. मात्र आज सकाळी (शुक्रवार) रेणू शर्मा यांनी कौटुंबिक कारणास्तव आपण ही तक्रार मागे घेतोय, असं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. कौटुंबिक वादातून मी त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु आता मी ही तक्रार मागे घेते आहे, असं रेणू शर्मा यांनी पोलिसांनी सांगितलं. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. डीसीपी अभिषेक त्रिमूखे यांनी संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याचं सांगितलं.