मेढा । निर्भीडसत्ता न्यूज
(सोमनाथ साखरे )
जावली तालुक्यातील एका डॉक्टरने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर ठेवत कोरोना काळात माहिती न ठेवने, रुग्णांना विनापरवाना उपचार करणे, अधिकाऱ्यांना माहीती न पुरविने आदी गंभीर स्वरुपाच्या कारणावरून प्राताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार राजेंद्र पोळ गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी अचानक टाकलेल्या धाडीत निदर्शनात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या आदेशाने केळघरचे डॉ. नितीन गुंड यांनी पंचनामा करून दवाखाना सिल केला पण गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत असल्याने या मागचे गौंडबंगाल काय अशी चर्चा जवळीतील मेढा परिसरात जोरदार सुरु आहे.
सदरचा दवाखाना हा एका रहिवाशी फ्लॅटमध्ये सुरु असल्याचे माहितीनुसार मेढ्यातील एका डॉक्टरने जिल्हा परिषदेची मान्यता न घेता दवाखाना उघडला होता . तसेच कोरोना काळात जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून कोरोना सदृश्य सर्दी, ताप, खोकला यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णावर आरोग्य विभागाला न कळवता डॉक्टर उपचार करत होते. याबाबत आरोग्य विभाग, तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार संबंधित डॉक्टरच्या दवाखान्यावर प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार राजेंद्र पोळ व गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी धाड टाकून या डॉक्टरची चौकशी केली.
यावेळी कोरणा काळात सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला खाजगी डॉक्टरांनी देणे बंधनकारक आहे. या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा संबधीत डॉक्टरने भंग केल्याचे पहाणीमध्ये दिसून आले. सदर चौकशीत या दवाखान्याला जिल्हा परिषदेची मान्यता घेतली नसून नोंदणी केली नसल्याचे आढळून आले . तसेच बायोमेडिकल वेस्ट ॲक्टचे प्रमाणपत्र मुदतबाह्य आढळले. रुग्णांचे रजिस्टर उपलब्ध नाही . फायर ऑडिट प्रमाणपत्र नाही. या डॉक्टरची होमिओपॅथीची पदवी असताना अलोपॅथी औषध व इंजेक्शनचा साठा मिळून आला. केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुंड यांनी पंचनामा करून या डॉक्टराचा दवाखाना सील केला आहे .
याबाबत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते याच्याशी संपर्क साधला असता मला अस काही माहीत नाही. मी माहिती घेवुन कळतो असे सांगुन माहिती देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यामागचा दिरंगाई पणा कशासाठी चाललाय हे डॉ. मोहीते यांच्या मौनावस्थेवरून लक्षात येते. तसेच गुन्हा दाखल करणार आहेत असे म्हणत होते पण अजुन डॉक्टरानी का केला नाही हे मला माहीत नाही असे सपोनि अमोल माने यांनी सांगीतले .