निर्भीड न्यूज
पिंपरी – पूर्वांचल विकास मंचतर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. आकुर्डी येथे मंगळवार, दि. 12 एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी भोजपुरी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे.
महापौर शकुंतला धराडे, प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, हिंदी-भोजपुरी अभिनेता रवी किसन यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण होणार आहे. मंगळवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता आकुर्डी येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खंडोबा माळ चौकातील शेम्बेकर मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव, इंटरनॅशनल पखवाज वादक, संगीतकार दुर्गा प्रसाद मुजूमदार, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, अनिल शिरोळे, माजी खासदार गजानन बाबर, राज्य लोक लेखा समितीचे अध्यक्ष ऍ़ड. सचिन पटवर्धन, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, ऍ़ड. गौतम चाबूकस्वार, संजय भेगडे, माजी महापौर योगेश बहल, सेवा विकास सहकारी बँकेचे चेअरमन ऍ़ड. अमर मुलचंदानी, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजोग वाघेरे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पिल्ले, भाजपाचे मुंबई येथील उत्तर भारतीय मोर्चाचे मोहित कंबोज, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, बाबासाहेब धुमाळ, चिंचवड येथील निरामय हॉस्पिटलचे डॉ. अजित यादव आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.
रुग्वाहिकेच्या लोकार्पणानंतर भोजपुरी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या वेळी सुमारे 20 हजार समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनेचे नेते आणि मंचचे आधारस्तंभ विजय गुप्ता, भोजपुरी चित्रपट निर्माते प्रेम राय, पूर्वांचल विकास मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा, कार्याध्यक्ष शशिकांत श्रीवास्तव, महासचिव बबलू अहिर, कोषाध्यक्ष आलोक सिंह, उपाध्यक्ष नेताजी सिंह, गुलाब तिवारी, गिरीजेश गिरी, रिशी पांडे, सचिव अहमद खान, स्वामीनाथ सिंह, रवी गुप्ता, अशोक दास यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात पुढाकार घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह परिसरात उत्तर भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्थिरावले आहेत. उद्योग-व्यवसाय आणि रोजगारानिमित्त लाखो नागरिक या महानगरात स्थायिक झाले आहेत. या नागरिकांच्या अनेक अडचणी आणि समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मंचतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. उत्तर भारतीय समाजासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देताना शैक्षणिक सुविधांवरही भर देण्यात येत आहे, अशी माहिती मंचचे अध्यक्ष विकास मिश्रा यांनी दिली.