पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
600 शालेय विद्यार्थ्यांच्या सामुहिक राष्ट्रगीत, ध्वजगीत, देशभक्तीपर गीताने संत तुकारामनगर पिंपरी येथील परिसर देशभक्तिमय झाला होता. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभागातील सुमारे एक हजार पेक्षा अधिक नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुख सुजाता पालांडे यांनी संत तुकारामनगर येथील जिजाऊ संस्कार शिल्प येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाला भाजपाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, सदाशिव खाडे, किरण मोटे, माऊली थोरात, कुणाल लांडगे, संदीप जाधव, महेंद्र बाविस्कर, सुनील पालांडे, सार्थ पालांडे, मंगेश धाडगे, सतीश नागरगोजे, दत्तात्रय धाडगे, कैलास मोरे, शरण शिंगे, राहुल खाडे, गणेश शंभेराव आदीसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील सर्वच सामाजिक, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
राजमाता जिजाऊ यांनी मोठ्या हिंमतीने शिवबांना घडविले. प्रेरणा दिली. त्यामुळे शिवबांनी अखंड रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. गोरगरीबांवरील अन्याय दूर केला. स्वराज्यामध्ये उत्तम प्रशासन चालविले. आपल्या अशा महान राजाचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊंचे योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. यासाठी संत तुकारामनगर येथे जिजाऊ संस्कार शिल्पाची निर्मिती करून त्या ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती, भाजपाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश मीडिया प्रमुख सुजाता पालांडे यांनी सांगितले.
या वेळी वर्ल्ड चॅम्पियन बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेता महेंद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. या ध्वजवंदन कार्यक्रमात भारतीय जैन संघटनेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच महापालिकेच्या लोकशाहीर आण्णा भाऊ साठे, दीनदयाळ शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी देखील सहभाग घेतला. सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे व सहभागी नागरिकांचे सुजाता पालांडे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.