पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरीतील संत तुकारामनगर, वल्लभनगर, महेशनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक संतोष इंगळे यांची आम आदमी पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. ते पूर्वी पिंपरी विधानसभा मतदार संघाचे प्रचारप्रमुख होते. त्यानंतर त्यांना पिंपरी मतदार संघाचे कार्याध्यक्ष पद देण्यात आले.
त्यांच्या कामाचा धडका पासून त्यांना शहर कार्यकारणीवर स्थान देण्यात आले. त्यांची नियुक्त आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सचिव तथा संघटन प्रमुख खासदार डॉ. संदीप पाठक आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.