मुंबई – तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रभासच्या आगामी साहो चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. बाहुबली चित्रपटात राजेशाही लूकमध्ये दिसलेला आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला प्रभास आता मॉडर्न लूकमध्ये दिसणार आहे. त्याचे हे लूक सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.
अबू धाबीसारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. चित्रपटातील अॅक्शन दृश्य चित्रीत करण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर केन्नी बेट्सची निवड करण्यात आलीय. यात मुख्य खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणण्यासाठी एवढ्या गोष्टी पुरेश्या आहेत. त्यात आता साहोमधील प्रभासचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर चर्चा होत असून त्याचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. पण, या लूकबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.