निर्भीडसत्ता – पोलीस म्हणून नोकरी करताना त्यांना नेमकं काय वाटतं आणि त्यांच्या काय भावना असतात आणि त्यांची घुसमट कशी होते ? या सगळ्याचे सुरेख आणि तितकेच विनोदी चित्रण समीर पाटील दिग्दर्शित ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटामध्ये केलेले आहे.
मराठीतील विनोदाचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, रमेश वाणी अशा स्टारकास्टसह समीर पाटील यांनी हा चित्रपट सादर केला आहे. पोलीस खात्यातील भ्रष्टाचार, तिथेच खुलणारी प्रेमकथा, त्यातूनच गुन्हेगारांना आणि बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी सतत तोंडाचा पट्टा चालवणारा साबेहराव या गोष्टी अतिशय खऱ्या वाटतात. अर्थात त्या मांडताना हलकीशी विनोदी झाकही देण्यात आली आहे. चित्रपटातील काही दृश्यं खटकतात. अर्थात तो चित्रपट असल्यामुळे काही बाबतील स्वातंत्र्य घेण्यात आलं आहे. ही बाबही नाकारता येणार नाही. पण, तरीही चित्रपट विनोदी अंगाने नेण्याचा जास्त प्रयत्न करण्यात आल्याचं लक्षात येतं.