निर्भीडसत्ता न्यूज –
‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील शिवानी बावकर उडंगा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तिला दुखापत होऊनही तिने चित्रीकरण पूर्ण केले.
झी मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेल्या “लागिरं झालं जी” या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे “शिवानी बावकर”. शीतल या कणखर व्यक्तिरेखेमुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली शिवानी सध्या उडंगा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या नावावरूनच तरुणाईमध्ये या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे.