निर्भीडसत्ता न्यूज –
स्वप्निल जोशीच्या भिकारी या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी खूपच चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि आता त्यानंतर प्रेक्षक देखील या चित्रपटाच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. या चित्रपटाने केवळ पहिल्या तीन दिवसात १ करोड ४८ लाखांची कमाई केली आहे. कोणत्याही मराठी चित्रपटाने केवळ पहिल्या तीन दिवसांत करोडोने कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटाचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.