निर्भीडसत्ता न्यूज –
टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने पहिल्या तीन दिवसात ४८.७० कोटी रूपयांची कमाई केली आहे. रविवारी या सिनेमाने १८.५० कोटींचा गल्ला जमवला. अभिनेता अक्षय कुमारच्या बॉक्स ऑफिसवरील यशाची मालिका जोरदार सुरूच आहे.
या सिनेमाने शनिवारी १७.१० कोटी रूपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी १३.१० कोटी रूपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण ३०.२० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आणि रविवारच्या १८.५० कोटींसह या सिनेमाने एकूण ४८.७० कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ १८ कोटी रूपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.
‘टॉयलेट एक प्रेम कथा’ भारतात ३ हजार आणि वल्डवाईड ५९० स्क्रीनवर रिलीज झाला आहे. याचप्रमाणे कमाई झाल्यास वीकेंडपर्यंत सिनेमाची एकूण कमाई ५० कोटींपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज लावला जात होता.