निर्भीडसत्ता न्यूज –
नेपाळ भूकंप आणि आता पूरामुळे संकटात सापडला आहे. या धक्कादायक घटनांनी मला दुःख झाले आहे. नेपाळमधील तराई भागातील मदत आणि बचाव कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी नेपाळला जात आहे. नेपाळमधील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मनिषा कोईराला नेपाळला रवाना झाली आहे.
नेपाळमधील तराई भागातल्या पूरग्रस्तांसाठी सुरु असलेल्या मदत कार्यामध्ये ती सहभागी होणार आहे.
मूळची नेपाळची रहिवासी असलेल्या मनिषा कोईरालाने स्वतः ट्विटरवर ही माहिती दिली आहे. मूळची नेपाळची रहिवासी असलेल्या मनिषा कोईरालाला या आपत्तीच्यावेळी आपल्या मातृभूमीमध्ये मदतीला जावे असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे.
2015 मध्ये नेपाळमध्ये 7.9 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्याचा केंद्रबिंदू काठमांडूच्या उत्तर पश्चिमेकडे सुमारे 80 किलोमीटरवर होता. या भूकंपामध्ये सुमारे 7 हजार जण मरण पावले होते, तर 14 हजारांपेक्षा अधिक जण जखमी झाले होते. तर 18 ऑगस्ट रोजी संपूर्ण नेपाळमध्ये झलेली अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे नेपाळमध्ये 120 जण मरण पावले आणि अद्यापही 35 जण बेपत्ता आहेत. तर सुमारे 6 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे.
‘युएनएफपीए’च्या टीमबरोबर तेथे काम करणार आहे. या मदत कार्याचा तेथे निश्चितच काही उपयोग होईल, अशी आशा वाटते. असे मनिषाने ट्विट केले आहे.