निर्भीडसत्ता न्यूज –
प्रस्तावित रिंगरोडसाठी उर्वरित जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका व प्राधिकरणामार्फत होणा-या कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या कारवाईला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बाधित नागरिकांनी केला आहे. त्यासाठी तिन दिवसात अठरा बैठका घेत बाधितांनी प्रशासनावर दुटप्पीपणाचा आरोप करत केला आहे.
वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या भागातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण प्रशासनाची याबाबतची दुटप्पी भूमिका आहे, असा आरोप या बाधित नागरिकांचा आहे. संभाव्य कारवाईबाबत येथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी बाधित नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करत तीन दिवसात तब्बल अठरा बैठका घेतल्या आहेत. प्रामुख्याने घर बचाव संघर्ष समीतीने गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, साईराज कॉलनी, शिवप्रसाद कॉलनी, गणेश कॉलनी, साईराम कॉलनी, चिंचवडेनगर, धनगरबाबा चौक, थेरगाव आणि पिंपळे गुरव येथे समितीच्या बैठका घेतल्या. प्राधिकरणाची कारवाई झालीच, तर मोठ्या प्रमाणात तीव्र विरोध करण्याचा ठराव एकमताने बैठकांमध्ये करण्यात आला आहे.