निर्भीडसत्ता न्यूज –
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, प्लास्टिकच्या पिशवीला पर्यायी व्यवस्था म्हणून कापडी पिशव्यांचा वापर केला पाहिजे, तसेच ‘प्लास्टिकची पिशवी देणार नाही व प्लास्टिकची पिशवी घेणार नाही अशी भूमिका व्यापारी व नागरिकांनी घेऊन प्लास्टिक बंदीसाठी व्यापारी व नागरिकांनी सकारात्मक पुढाकार घ्यावा असे आवाहन येथील स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी केले आहे.
नगरसेवक नाना काटे, सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर, सिद्धार्थ नाईक, अभिजित देशमुख, मिथुन गोडबोले व अभय कुलकर्णी यांच्यासह सभासद यावेळी उपस्थित होते.
नगरसेवक नाना काटे म्हणाले की, पर्यावरणाची मोठी हानी प्लास्टिकमुळे झाली आहे आणि होत आहे. याचा परिणाम हळूहळू मानवी आणि प्राणी जीवनावरही होत आहे. त्यामुळे समाज आणि संघटनांनी या अभियानाचा जोरदार प्रचार आणि प्रसार करावा.
यासंदर्भात काही दिवसापूर्वी पिंपळेसौदागर येथील रोझलैंड रेसिडेन्सीमध्ये इको एक्झिस्ट कंपनीच्यावतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला.