निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी ते दापोडी बीआरटी मार्गावरील बसथांब्यांची दुरुस्ती व इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत. ही कामे झाल्यानंतर पुढील आठवड्यात बस चाचणी सुरू होणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले आहे.
निगडी-दापोडी या मार्गावर बीआरटीला विलंब झाल्याने नागरिकांना वाहतूक समस्येला सामोरे जावे लागते. त्यात आता मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे पिंपरी ते दापोडीदरम्यान वाहतुकीला अडथळा होत आहे. मागील अडीच वर्षांपासून सुरू करण्याचे नुसती घोषणा केली गेली. पण सुरू झाली नाही. पालिकेने सध्या हा बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी तयारी केली आहे. बसथांबे व कॅरिडॉर दुरुस्तीसाठी पुन्हा खर्चही केला आहे. ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच बस चाचणी घेतली जाणार आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.
सुरक्षेच्या कारणावरून या मार्गाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यासाठी सर्व सुरक्षा उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.