यावेळी त्यांच्यासमवेत अश्विनी जगताप, महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सरचिटणीस प्रमोद निसळ, नगरसेवक सागर आगोळकर आदी या वेळी उपस्थित होते.
पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या पवनाथडीत 872 महिला बचत गट सहभागी असून, 429 एवढे स्टॉल आहेत. महिलांनी केलेल्या विविध ठिकाणचे खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी सध्या पवनाथडी जत्रेत उपलब्ध आहे. सांगवीत भरविण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महिला बचत गटांनी विविध मसाले, कपडे, घर सजावटीच्या वस्तू, विणकाम केलेल्या वस्तू, उन्हाळी सामान विक्रीसाठी ठेवले आहे. घरगुती मसाले व उन्हाळी सामानाकडे महिला वर्गाचा विशेष ओढा दिसत आहे. महापालिकेच्या वतीने या ठिकाणी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे खरेदी, खवय्येगिरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र आहे.