निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी जत्रेसाठी मंगळवारी (दि.९) आणखी एक दिवस वाढविण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर ४ ते ८ जानेवारी २०१८ या कालावधीत ही जत्रा भरविण्यात आली होती. जत्रेचे यंदाचे अकरावे वर्ष असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचा फायदा महिला बचतगटांना देखील होत आहे. त्या उद्देशाने महापालिकेने आणखी एक दिवस पवनाथडी जत्रा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत ही जत्रा सुरू ठेवण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.