निर्भीडसत्ता न्यूज –
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी टाटा कॅपिटल फायनान्सतर्फे आयोजित मेळाव्यात संतप्त झालेल्या नागरिकांनी तोडफोड केली. स्वस्तात घर मिळणार असल्याचे सांगून फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी केला.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टाटा फायनान्सच्या वतीने चिंचवड येथील अॅटो कलस्टरमध्ये मेळावा घेतला होता. या मेळाव्यात नागरिकांनी स्टॉलची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. तोडफोडीनंतर स्टॉल बंद करण्यात आले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी ताताडीने घटनास्थळी भेट दिली. नागरिकांना शांत करत प्रकाराची चौकशी केली.
स्वस्तात घर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला. मात्र, इथे आल्यावर घरांच्या किमती जास्त सांगितल्या आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे नाव सांगून आमची फसवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. तर, पोलीस व टाटा फायनान्सकडून नागरिकांमधील गैरसमजातून हा सगळा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.