निर्भीडसत्ता न्यूज –
चिंचवड येथे ‘पंचम’ मराठा वधु-वर सूचक मंडळाच्या वतीने रविवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10-30 ते 4 -30 या वेळेत वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील चैतन्य सभागृह येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती ‘पंचम’ मराठा वधु-वर सूचक मंडळाने दिली आहे.
चिंचवड गावातील चाफेकर चौक येथे या ‘पंचम’ मराठा वधु-वर सूचक मंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी इच्छुक वधुवरांची नावनोंदनी सुरु आहे, तरी इच्छुक वधुवरांनी नावनोंदनीसाठी 8237059305, 02027613847 या नंबरवर संपर्क साधावा अशी माहिती वधु-वर सूचक मंडळाने दिली आहे.
वधु-वराणी बायोडाटा, फोटो, जन्मपत्रिका व शैक्षणिक पात्रतेचा दाखला अशी कागदपत्रे सोबत आनावित असे, असे आवाहन ‘पंचम’ मराठा वधुवर सूचक मंडळाचे अध्यक्ष किसनराव झेंडे व सेक्रेटरी कैलास इंदलकर यांनी केले आहे. तसेच या वधुवर मेळाव्यास जास्तीत जास्त वधु-वरानी सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.