निर्भीडसत्ता न्यूज –
वाकडमध्ये महामार्गावर जबरदस्तीने एसटी बस थांबवून एसटीची तोडफोड करत एसटी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही घटना शुक्रवारी (दि.२६) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून संबधित एका टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
एसटी चालक सचिन जाधव (वय ३८, रा. दौड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैजनाथ कदम (वय २७, रा. पडवळनगर, थेरगाव, पुणे) या टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे बोरविली ते सासवड एसटी बस घेऊन जात होते. दरम्यान, वाकड शनि मंदिराजवळ महामार्गावर कदम याने एसटीला टेम्पो आडवा लावला. एसटी थांबवून दगड मारून तोडफोड केल. तसेच, शिवीगाळ व हाताने मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला.
सहायक पोलीस निरीक्षक एम. पी. सोनवणे तपास करीत आहेत.