निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता योगेश बहल, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक केशव घोळवे, भिमाबाई फुगे, आनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, कमल घोलप, राजू मिसाळ, उत्तम केंदळे, राहुल जाधव, शैलेश मोरे, अमित गावडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखा परीक्षक पद्मश्री तळदेकर, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, योगेश कडूसकर, मनोज लोणकर, विजय खोराटे, आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, संदिप खोत, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय संचालक पवन साळवे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, आयुबखान पठाण, रवींद्र दुधेकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, अग्निशामक अधिकारी किरण गावडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.