निर्भीडसत्ता न्यूज –
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 30 जानेवारी) सकाळी 10 वाजता निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. असे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी कळविले आहे. कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू, भगिनींनी या रॅलीत सहभागी होण्यासाठी स्व:ताची सायकल घेऊन यावे, असे आवाहन शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले आहे.