निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या प्रवक्तेपदी उपअभियंता आबासाहेब ढवळे यांची नियुक्ती झाली आहे.
सहशहर अभियंता राजन पाटील यांनी उपअभियंता आबासाहेब ढवळे यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. ढवळे यांनी महापालिकेच्या नगररचना, स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिस:रण आणि बांधकाम परवाना या विभागांमध्ये काम पाहिले आहे. ते प्रसारमाध्यमांना कारवाईबाबत माहिती देणार आहेत.