निर्भीडसत्ता न्यूज –
महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२२) काळेवाडी परिसरातील दहा अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या भागात पुररेषेत अनधिकृत पत्राशेडचे प्रमाण अधिक असल्याने महापालिकेकडून येथे कारवाई सत्र सुरू आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने गुरुवारी काळेवाडीतील विजयनगर, आदर्शनगर या भागात ही कारवाई केली. पुररेषेतील पाच अनधिकृत पत्राशेड व पाच आरसीसी पक्की बांधकामे या कारवाईत भुईसपाट करण्यात आली. सुमारे १४ हजार १०६ चौरस फुटांच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
कारवाई एक कार्यकारी अभियंता, १ उपअभियंता, दोन कनिष्ठ अभियंता, १० बीट निरीक्षक, १० पालिका कर्मचारी, २ जेसीबी, २ डंपर, २० मजूर आणि १५ पोलीस अधिकारी, कर्मचा-यांच्या सहकार्याने करण्यात आली.