निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय मायनॉरिटीज सुरक्षा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती कदम यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भोसरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मारुती कदम हे गोंधळी समाज सेवा संघ आणि भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे पदाधिकारी असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.