निर्भीडसत्ता न्यूज –
पाषाण येथील कोकाटे तालीम मंडळच्या वतीने पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल ताथवडे गावातील पैलवान सचिन पवार तसेच सामाजिक कार्याबद्दल पिंपळेगुरवमधील मराठवाडा विकास मंचाचे अरूण पवार यांचा पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला. आळंदी येथील हभप माऊली महाराज कदम यांच्या हस्ते पवार यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदुंगाचार्य पांडुरंग दातार, हभप भानुदास वळे, मंडळाचे अध्यक्ष उद्धव वळे, राहुल कोकाटे, सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे, नंदु कोकाटे व पाषाणमधील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
या वेळी व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन करणाऱ्या अनिता गाडगीळ, समाजसेवेबद्दल अशोक साठे, आबासाहेब सुतार, मराठवाडा विकास मंचाचे अरूण पवार, गुलाबराव तापकीर, सरपंच बबनराव धावडे, मधुकर रणपिसे, पै. विजय गावडे, हभप बबनराव भेगडे (विणेकरी) यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन मारूती कोकाटे यांनी केले.